वीतभर = अंगठा आणि करंगळी एकमेकांच्या विरुद्ध दिशांना लांब ताणून. सामान्यतः हे हाताच्या पंज्याने मोजता येणारे सर्वात मोठे माप आहे.
टीचभर = हाताची पाची बोटे एकत्र करून (कराटेमध्ये चॉप मारतात तशी). करंगळीच्या लांबीसापेक्ष अंगठ्याची लांबी आणि करंगळीच्या मूळसापेक्ष अंगठ्याचे मूळ कुठे आहे त्यावर अवलंबून असते. काही लोकांच्या हातामध्ये हे अंतर करंगळी च्या लांबीपेक्षा जास्ती तर काहींमध्ये कमी असते.