लेख वाचला.
प्रकाश वगैरे टाकण्याइतके ज्ञान नाही, पण 'हसत खेळत मनाची ओळख' आणि 'सिल्वामाइंड कंट्रोल' पुस्तके वाचून कळलेले हे काही मुद्देः
१. अगदी एकाग्र झोपेत/झोपेतून जागे होण्याआधीचे काही क्षण/झोप लागल्यानंतर लगेचचे काही क्षण आपल्या मेंदूची वारंवारता(फ्रिक्वेन्सी) अगदी कमी (<४) असते. अशा अवस्थेला अल्फा अवस्था म्हणतात. आणि अल्फा अवस्थेत आपण जे काही ऐकू पाहू ते सर्वात चांगले ग्रहण होते. साधारणतः अगदी लहान मुले(०-४ वर्षे) ही पूर्णवेळ अल्फा अवस्थेत असतात. त्यामुळे सर्वात मूलभूत आणि कठिण ज्ञान ती मुले याच वयात ग्रहण करतात. थोडक्यात म्हणजे जर अल्फा अवस्थेत अभ्यासपूर्वक जास्त वेळ जाता आले आणि त्या वेळात उशाखाली यंत्र ठेवून किंवा कोणाच्या तोंडून काही ऐकले तर फायदा निश्चित होतो. हा प्रयोग लहान मुलांच्या अभ्यासाबाबतही करता येईल.
२. लहान वयात, म्हणजे अगदी नुकतीच समज येत असताना घडलेल्या घटनांचा मनावर जास्त खोल परिणाम होतो आणि त्याचे प्रभाव मोठेपणीच्या जीवनावर दिसतात. याचे उदाहरण देताना त्या पुस्तकात एक गोष्ट सांगितली आहे.
एक प्रसिद्ध व्यापारी आपल्या एका सवयीने हैराण असतो. कोणताही व्यवहार करताना ,पैसे देताना किंवा घेताना त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत असे. ही सवय बऱ्याचदा लाजिरवाणी ठरत असे. शेवटी तो एका मानसोपचारतज्न्याकडे गेला. तज्ज्ञाने विचारलेः 'तुम्हाला अगदी लहानपणीची एखादी गोष्ट नीट आठवत असेल ती सांगा.' व्यापाऱ्याने सांगितले, 'अगदी लहानपणी आम्ही खूप गरिब होतो. आई कामावर जायची. मी आसपास फिरुन टोपीत पैसा गोळा करायचो. मला ते आवडायचं नाही. बऱ्याचदा माझे अश्रू ओघळून तोंडात जायचे. लोक ते पाहून दयेने मला पैसे देत.' अशाप्रकारे 'पैसे' आणि अश्रू यांचे नाते त्याच्या मनात खोल दडून होते आणि मोठेपणीसुद्धा नेहमी पैशाचे व्यवहार करताना त्याच्याही नकळत त्याच्या डोळ्यातून पाणी वाहे. ही गोष्ट त्याला नीट समजावून सांगितल्यावर हळूहळू ही सवय कमी होऊन नष्ट झाली.
यासारखेच प्रसिद्ध उदाहरण कुत्रा आणि घंटा यांचे आहे. (एक्स्टरनल स्टिम्युलस.)
३. स्वप्नांवरही बाह्य संवेदनांचा परिणाम आढळून आला आहे. डोळ्यासमोर जळती काडी धरल्यावर कित्येक लोकाना आगीशी संबंधित स्वप्ने पडली.
विषय खूप चांगला आणि रंगतदार आहे. इतरांकडून माहिती ऐकायला आवडेल.