मुलाखती वाचल्या आणि आवडल्या सुद्धा.
काही सूचना करावश्या वाटतात.
- आपण या उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. जमल्यास स्थानिक वर्तमानपत्रात जुजबी माहिती देणारा लेख लिहावा.
- तिरुपती देवस्थानाने तेलगु भाषेसाठी जसा प्रकल्प हातात घेतला आहे तसा आपण शेगाव, शिर्डी , सिद्धिविनायक अथवा दगडू शेठ हलवाई या संस्थानांना विनंती करायला हवी.
- या संकेतस्थळाला काहीतरी प्रतिसाद, शंका पाठवत राहाव्या. जे संगणक क्षेत्रात आहेत त्यांनी यात विधायक सहभाग घ्यावा.
देवदत्तांनी असेच दुवे देत जावेत ही आग्रहाची विनंती.