खालिस म्हणजे शुद्ध, भेसळ नसलेले. त्यापासून निखालस हा शब्द तयार झाला असावा. पण निखालसचा अर्थ नक्कीच अशुद्ध नाही. दुसऱ्या भाषेतून शब्दांचे आदान होताना कसे अर्थांतर होते, याचे हे उदाहरण असावे.