प्रशासक महोदय,
१.
घटना-
इंटरनेट एक्सप्लोरर (६.०.२९००) ला नुकतेच याहू आणि गुगल यांच्या कळपट्ट्या (टूलबार) लावल्या. (विंडोज एक्स.पी. घरगुती आवृत्ती, सेवामंजुषा २). या दोन्ही मध्ये 'चोंबड्या खिडक्यांना' (पॉपअप्स) आडकाठी करायची सोय आहे. प्रतिसाद लिहिताना एकदा अनावधानाने गुगलची ही आडकाठी चालू (आणि याहू ची बंद) होती. तर संगणक अडून बसला. ब्रह्मास्त्र (कंट्रोल+अल्टर+डीलीट) वापरून इं.ए. बंद करावा लागला. लिहिलेला प्रतिसाद परत लिहून काढावा लागला.
सुचवण-
शुद्धिचिकित्सक सुरू होता होता अश्या आडकाठ्या तपासू शकेल का? आडकाठी चालू असेल तर तशी सूचना देऊन बंद (अबॉर्ट) होऊ शकेल का? म्हणजे संगणक अडून बसणार नाही. आणि लिहिण्याचे कष्ट सुद्धा वाया जाणार नाहीत.
२.
सुचवण-
शुद्धिचिकित्सक चालू करण्यासाठी एफ-७ ही कळ वापरण्याची सोय करता येईल का?