भोमेकाका,
आपण सांगितलेल्या
घटनेमध्ये, पॉप-अप अडवून फक्त तसा संदेश वापरकर्त्याला मिळाला पाहिजे.
संगणक अडून बसत असेल तर तो दोष संकेतस्थळाचा
नाही. (तुम्हाला असे म्हणायचे नाही, हे मला माहित आहे)
कदाचित मनोगत वर तुम्ही म्हणता तशी सोय झाली पण उद्या तुम्ही जर रेडिफ.कॉम
किंवा टाइम्सऑफइंडिया.कॉम उघडले तर तिथे पॉप-अप येतीलच आणि आपला संगणक
पुन्हा भंजाळेल ;)
विंडोज एक्सपी सर्विस पॅक २ असेल तर इं.ए. मध्येच अडवणुकीची
सोय (की गैरसोय?) असते. त्यासाठी याहू/गूगल टूलबार्सची गरज नाही.
मासॉ नियंत्रण प्रणाल्या अडून
बसण्यासाठी आणि सर्व काही घेऊन बुडण्यासाठी (क्रॅश)
प्रसिद्ध आहेतच. शिवाय याहू चा चोंबडेपणा आता जगजाहीर झाला आहे. असो.
आपला,
(संगणकमुक्तीवादी) शशांक
बाकी "चोंबड्या खिडक्या", "सेवा मंजुषा", "ब्रह्मास्त्र" खासच हीहीही!