आज मिळालेले काही दुवे..
१. मराठीमाती.कॉम
२. तुकाराम.कॉम : मी हा दुवा देण्याकरीता आधी मनोगतवर शोधले. तेव्हा भरपूर लेख मिळाले. त्यात भरपूर माहिती मिळाली. बहुधा ह्या दुव्याचाही उल्लेख आला असेल. त्यामुळे ह्या दुव्यावर किती अधिक माहीती असेल त्याचा अंदाज नाही. 
३.विकिपीडीयाः इथेही मराठी लेख वाचायला/लिहायला मिळतील. ह्या जागेचे मला हे महत्व वाटते की, ह्या जागेवर १०० पेक्षा जास्त भाषेत लेख आहेत. (मी सर्व तपासले नाहीत ;-) ). त्यामुळे ह्या जागेवर भरपूर लोकांच्या टिचक्या पडत असतील. मराठी भाषा जगभरात पसरविण्यास ते आणखी एक माध्यम होईल. त्यात, मराठी विकिपीडीया अजून बाल्यावस्थेत आहे. आणि विशेष म्हणजे येथेही आपण मनोगत प्रमाणे स्वतःचे लेख लिहू शकतो. आपण त्याला वाढण्यास मदत करू शकतो.

माझ्या मते आपण सर्व दुवे लिहिण्यासाठी मनोगतवर एक नवीन लेख सुरू करावा. परंतु त्यावर चर्चा नसावी. ती फक्त एक सूची असावी. म्हणजे सर्व दुव्यांकरता एक जागा मिळेल.

-देवदत्त