माधुरी ताई,
अभिनंदन. माझ्या अतिशय आवडीच्या विषयावर तुमचे लेखन वाचताना मनापासून आनंद होत आहे.
अद्भुतरम्य कथांचे दालन.
हिंदी भाषासुद्धा याबाबतीत समृद्ध आहे असे ऐकले होते पण आज तुमच्या लेखणीतून वाचण्याचा आनंद घेत आहे.
थोडक्यात म्हणजे तो त्या काळातील जेम्स बाँड होता!
मला जर विचारले तर मी असे लिहीन, की जेम्स बाँड जणू धुंडीराजच होता. वचने किम् दरिद्रता.
अजून एक माहिती सांगावीशी वाटते. ४०/५० वर्षापूर्वी चंद्रकांता ही अशीच यशस्वी आणि लोकप्रिय कादंबरी होऊन गेली. त्याचा मूळ भाषेतील आस्वाद घेण्यासाठी अनेक लोकांनी हिंदी भाषा शिकून घेतली. आता बोला....
तुमच्या उपक्रमासाठी मनापासून शुभेच्छा!!!.
द्वारकानाथ