मूळचा पूर्ण वाक्प्रचार असा आहे --

"घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणे"
  असा आहे.  याचा अर्थ असा कि स्वतःच्या पदराला खार लावून दुसऱ्याचे काम करणे.

पूर्वी (मध्ययुगात- मोगल, शिवाजी, पेशवाई या काळात) सैन्याचा कारभार एक वैशिष्ठ्यपूर्ण रित्या चालवला जायचा.  खडे सैन्य म्हणजे नेहमी कामावर असणारे लढवय्ये जेव्हा मोहिमेवर निघत तेव्हा ज्या गावात त्यांचा मुक्काम असे तिथल्या स्थानिक लोकांना (बहुशः जबरदस्तीने) सैन्याकरता स्वयंपाक करण्याकरिता तसेच इतर कामे करण्याकरता, वेठीने (पैसे न देता) कामाला बोलावले जायचे.  त्यावरून घरचे खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजणे हा वाक्प्रचार प्रचलात आला.

अशाच पद्धतीने बाजारबुणगे हाही शब्द आला आहे.  बाजारबुणगे हे सैन्याबरोबर प्रवास करणारे इतर वस्तू विकणारे लोक होते.  ते प्रत्यक्ष लढाईत भाग न घेता सैन्यातल्या लोकांना लागणारे सामान, आणि सेवा देत असत.  यात न्हावी, शिंपी, चांभार, वैद्य, जडीबुटीवाले व्यवसाईक असत.

चू.भू.द्या.घ्या.
सुभाष