श्री. केतन गोकर्ण,
दोन ग्लास नारळाचे दूध, कोकमं, लसूण आणि मिरच्यांच्या एकत्रित स्वादात १" बीटरूटाचा सौम्य गोडसर स्वाद लपतो आणि त्याचा तजेलदार कोनफळी रंग सोलकढीला उठाव आणतो. तसेही, बीटरूट नको असल्यास टाळावयास हरकत नाही.
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
श्री. सुकु,
अमेरिकेच्या बाजाराची मला कल्पना नसल्यामुळे मी काहीच पर्याय सुचवू शकत नाही. परंतु, आपले 'सहमनोदर' श्री. भाष ह्यांनी पर्याय सुचविला आहे तो वापरून पाहावा आणि आपल्या प्रयोगाच्या यशस्वीतेचे वर्णन मनोगतावर उपलब्ध करून द्यावे, जेणे करून इतर अमेरिकन मनोगतींनाही 'क्रॅनकढी'ची मजा लुटता येईल.
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
श्री. भाष,
तत्परतेने मदतीस धावून आल्याबद्दल धन्यवाद. चवी बद्दल आपण लिहिले आहेच पण क्रॅनबेरीचा रंग आणि औषधी गुणधर्मही (पित्तशामक वगैरे) आपल्या कोकमासारखेच आहेत का? कळवावे, उत्सुकता आहे.
श्री. श्रावणधारा,
आपला अभिप्राय वाचून मलाही माझे मस्कत मधील जुने दिवस आठवले. अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला चटकन घराची आठवण करून देतात आणि टचकन डोळ्यात पाणी आणतात. असो.
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
श्री. विसोबा खेचर,
एक एक करून सर्व पाककृती मनोगतावर येतीलच. पण आधी दिलेल्या पाककृती मनोगतींनी करून पाहाव्यात आणि व्यक्तीगत निरोपांतून त्यांचे अहवाल (रिपोर्ट) वाचावयास मिळावेत असे वाटते. जेणे करून नवीन नवीन पाककृती देण्यास मलाही उत्साह वाटेल. नाहीतर ही निव्वळ एकतर्फी मेहनत आणि करमणुकीचे सदर होईल.
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
श्री. अगस्ती,
आपला अभिप्राय रोचक आहे. मजा आली वाचताना. बांगड्याचे कालवण, मालवणी कोंबडी, सोलकढी आणि मांडवकराच्या अड्ड्याने उत्कृष्ट 'वातावरण' निर्मिती साधली आहे. ३१ डिसेंबर गोव्यात साजरा करायचा विचार आहे. पोटाचा, सोलकढीत पोहणाऱ्या माशांचा 'फिशटँक' करूया. येताय?
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.