पुस्तकी हिंदी सक्तीने मराठी लोकांवर लादायची गरज नाही.

ज्याला गरज आहे तो ती बोलीभाषा म्हणून शिकेल असे धोरण ठेवावे.

इंग्रजीचे तसे नाही. त्यातील प्रचंड ज्ञान शिकायला ती भाषा येणे आवश्यक आहे. उदरनिर्वाह नीट होण्याकरता इंग्रजीला पर्याय नाही.

हिंदीला एकमेव राष्ट्रभाषा बनवायचे सरकारकडे नीट धोरण नव्हते. दक्षिणेतील विरोधामुळे ते होईल असे वाटत नाही मग आपण आपल्या भाषेला का कमी महत्त्व द्यायचे?

आपले मुद्दे अत्यंत योग्य आहेत. हिंदीचे समर्थक बहुतांश भावनेला हात घालणारी वक्तव्ये/मुद्दे मांडत आहेत. त्याला तर्काचे पाठबळ नाही असे माझे मत.

सहमत.