मी ही चर्चा वाचली. पण प्रतिक्रिया लिहिण्याबाबत माझे मुद्दे तयार नाहीत. परंतु एका मुद्द्यावर माझे विशेष लक्ष होते.

महाराष्ट्रात दोनचारच वर्षे राहायला आलेले, नोकरीनिमित्त, बदली होवून तात्पुरते राहाण्याचा उद्देश असणारे लोक येथील भाषा बोलू इच्छित नाहीत, शिकत नाहीत हे एक वेळ समज़ण्यासारखे आहे; पण पाचपाच, दहादहा वर्षे इथे राहाणारे लोकही मराठी शिकत नाहीत हे त्यांना, आणि ते तसे न बोलता सहज़ सन्मानाने इथे राहू शकतात, समृद्धी मिळवू शकतात हे आपल्याला लज्जास्पद आहे!

आपले पूर्व राज्यपाल मा. श्री. पी. सी. अलेक्झांडर ह्यांना मी कधी मराठीत भाषण देताना नाही पाहिले (अर्थात दूरदर्शन वर. प्रत्यक्षात नाही). राज्याच्या सरकारी कामातील एक उच्चपदावरील व्यक्तीनेही असे करावे आणि त्याला विरोध नसावा हे चुकीचे वाटते.

माझ्या ह्या मतावर काही वेगळे प्रश्न येऊ शकतात. मला मिळालेल्या माहिती प्रमाणे राज्यपाल त्या राज्याचा नसतोच. का हे जर नागरीक शास्त्रात शिकविले असेल तर मी ते विसरलो आहे :( क्षमस्व.

आता सुशीलकुमार शिंदे ह्यांनाही तेलुगू येते की नाही ह्याची मला माहिती नाही.

हे माझे ठोस मुद्दे नाहीत. मी माहिती जमा करतोय. त्यामुळे ह्यावर माहीती मिळेल का?

-देवदत्त