वा! दुसरा भागही छानच.
शेवटी देव जसा एक तसाच माणूसही एक आणि त्याची भक्तिभावनाही एक; परिवेश तेवढा निराळा!
त्याच्या प्रचंडपणापुढे क्षुद्र ठरणाऱ्या आपल्या अस्तित्त्वाचा एरवी आपण केवढा गहजब माजवत असतो.
ज्या ठिकाणी मनाला स्नान घडतं व ते स्वच्छ होऊन जातं, तो स्वर्ग! ज्या ठिकाणी मनातल्या काळोखाच्या भावना दूर होतात आणि मन लखलखीत उजेडाने भरून जातं, तो स्वर्ग आणि ज्या ठिकाणी साऱ्या तपशिलांच्या कपच्या गळून पडून आपल्या अस्तित्त्वाचा केवळ एक ठिपका शिल्लक राहतो तो स्वर्ग!