आपण लिहिलेल्या बोलतो तसे लिहिण्याला भाष्यटंकांकन म्हणता येईल. (याला ट्रान्स्लिटरेशन म्हणतात, अधिक माहिती इथे पाहा.) यासाठी मनोगताप्रमाणेच कंळसंच संकेत असतात. काही प्रणाल्यांची माहिती व मला असलेल्या समस्या खाली देत आहे.
१. मला सध्या माझ्या संगणकावरील मराठी हिंदी मजकूर हा मंगल ह्या युनिकोड टंकातून दिसतो. याचे कारण "क्लिष्ट लिपी' या सदरात मंगल शिवाय दुसरा कोणताच टंक उपलब्ध नाही. शिवाजी व इतर युनीकोड टंकांची माहिती वाचली ते उतरवूनही पाहिले पण मंगल्याला बाधा आली नाही :(. मनोगतावर वापरलेला 'हा' टंक कोणता? नोटपॅड इत्यादी मध्ये युनीकोड मजकूर असाच दिसेल यासाठी काय काय करावे लागेल?
२. मराठी लेखनासाठी मी दोन पर्याय वापरतो (आणखी बरेच असावेत बरहा इत्यादी) पैकी इंडीक पेक्षा मला अक्षरमाला हा मनोगतावरील टंकलेखनाच्या संकेतांशी जवळचा वाटतो. मनोगतावर वापरलेल्या कळसंकेतांशी समरूप असणारी प्रणाली कोणती?
(यांचा वापर करून माझा याहू व जीमेलटॉक निरोपे (निरोप्याचे अनेकवचन) सध्या देवनागरीतून बोलतो! अधिक माहिती साठी उत्सुकता दाखवा :) )