आत्ताच्या गणेशोत्सवाच्या काळात मी बरेच ठिकाणी "लालबाग चा राजा" असे लिहिलेले वाचले -
"लालबाग चा राजा" हे "लालबाग का राजा" याचे साधे सरळ भाषांतर आहे असे कोणासही वरकरणी वाटेल. पण हे तितके सोपे नाही. हा मराठीवर पडणारा / पडलेला एक जबरदस्त प्रभाव असल्याचे उदाहरण आहे.
"लालबाग" ह्या शब्दाचे सामन्यरूप होत नाही तरी मराठीत "चा" हे एक शब्दयोगी अव्यय आहे आणि म्हणूनच ते नामाला लागूनच आले पाहिजे. हिंदीत शब्दयोगी अव्यय हा प्रकारच नाही.
म्हणूनच "लालबागचा राजा" असेच लिहिले गेले पाहिजे.