हातावरील रेषा जुळवून शोधतो मी
कुठल्या सिकंदराचे घेऊन भाग्य आलो

हातात हात आला, आला, सुटून गेला
मी हात चोळण्याचे घेऊन भाग्य आलो

दोन्ही शेर,क्या बात है!

शरपंजरी न पडलो, ती थोरवी न माझी
अन् दक्षिणायनाचे घेऊन भाग्य आलो

हा शेर कळला नाही...

जगण्याशिवाय जमले नाही, मिलिंद, काही
वावा!!
सामान्य माणसांचे घेऊन भाग्य आलो

मक्ता छान आहे.
गझल आवडली.