याचे दोन पर्याय आहेत.
पण दोन्हीसाठी मूलभूत आवश्यकता म्हणजे याहू निरोप्याची (नवी) ७ (प्रायोगिक) आवृत्ती.
१. अक्षरमाला - यात प्रथमतः संदेश नोटपॅड मध्ये लिहा व याहू निरोप्याच्या खिडकीत चिकटवा! (थोडा द्रविडी प्राणायाम आहे खरा पण सध्या तरी याहू निरोप्या जीमेलटॉक ह्या गूगलच्या निरोप्याप्रमाणे अक्षरमालेचा थेट वापर करू द्यायला तयार नाही)
२. जर थेटच लिहायचे असेल तर.. संगणकाची डीफॉल्ट भाषा हिन्दी करा, व कळसंच हिन्दी इंडीक आय. एम. ई. १ (आवृत्ती ५.०) हा वापरा. येथे भाषा हिन्दी असल्याने व कळसंच संकेत काहीसे वेगळे असल्याने सराव होण्यास वेळ लागेल, पण सोबतीला सहाय्यक आहेच की!
(हे सारे विन्डोज एक्सपी बद्दल लागू आहे इतर प्रणाल्यांवर चाचण्या केल्या गेल्या नाही आहेत.)