माझ्यामते मेषपात्र म्हणजे बावळट, जे वर्तनाचे विशेषण आहे, तर अजागळ हे राहणीचे विशेषण आहे. मूळ शब्द अजागल - अज म्हणजे बोकड, गल म्हणजे गळा. बोकडाचा गळा जसा कसातरीच दिसतो, त्याप्रकारची राहणी. उदाहरणार्थ ढगळ, चुरगळलेले, विसंगत रंगसंगतीचे कपडे घालणे म्हणजे अजागळ राहणी. मात्र बावळटपणा हा स्वभावात वा वर्तनात दिसतो, त्याचा राहणीची संबंध असेलच असे नाही.