मराठा यांचे मुद्दे मला पटले. याआधी या दृष्टीने मी कधी विचार केला नव्हता. जिकडे जाऊ तिकडची भाषा शिकून घ्यावी हा विचारही मला पटतो.
हिंदी भाषेचा प्रसार (कदाचित राष्ट्रभाषा प्रचार समितीपेक्षा जास्त प्रमाणात) हिंदी चित्रपटातून होतो असे वाटते. बंगलोरातल्या माझ्या अनेक दाक्षिणात्य सहकाऱ्यांना शाळेत हिंदी विषय नव्हता (त्याऐवजी संस्कृत होते) पण हिंदी चित्रपटातून पाहून ते लोक मोडकी तोडकी हिंदी बोलू शकत असत.