पुल्लिंगात बाग हा शब्द बागात बागाचे असा चालवतात. उदा. 'सख्या चला बागामधी रंग खेळू चला.'
अनेकवचन बाग. उदा. 'केळीचे सुकले बाग'
आता लालबाग.
१. ह्या शब्दाचे सामान्यरूप होते ह्या दृष्टिकोणातून.
स्त्रीलिंगी - लालबाग लालबागा - लालबागेत लालबागेचा पुल्लिंगी - लालबाग लालबाग लालबागात लालबागाचा
असे सामान्यरूप होत असताना सुद्धा लालबागचा हे व्याकरणदृष्ट्या शुद्ध रूप होते. त्याचा अर्थ सप्तमी दर्शक घेतात. म्हणजे माहेरचा, सासरचा, बाजारचा तसा लालबागचा. येथे लालबागचा ह्याचा अर्थ लालबागेत (किंवा लालबागात) असणारा/राहणारा राजा (किंवा त्या नावाचा माणूस.) (जसे लालबागचा पोलीस, लालबागचे दुकान इ.) लालबागेवर किंवा लालबागावर राज्य करणारा राजा ह्या अर्थी लालबागेचा किंवा लालबागाचा राजा असेच शुद्ध रूप झाले असते.
२. सामान्यरूप होत नाही असे धरले तर हे प्रश्न निर्माण होत नाहीत. इंग्लंडचा राजा तसा लालबागचा राजा! मग तो राज्य करो वा नुसताच तिथे राहो!
कसेही झाले तरी विभक्तिप्रत्यय शब्दाला जोडायला हवाच.
चू.भू.द्या.घ्या.