माझ्या कल्पनेप्रमाणे "बाग" हा उर्दूमध्ये पुल्लिंगी शब्द असला तरी मराठीमध्ये बाग हा शब्द स्त्रीलिंगी आहे. उदाः राणीची बाग. 

जर तो पुल्लिंगी धरला तरी त्याचे सामान्य रूप "लालबागाचा राजा" जसे "देशाचा राजा" (हिंदीमध्ये मात्र "देशका राजा) 

परंतु स्त्रीलिंगी धरून तो शब्द "लालबागेचा राजा असे व्हायला पाहिजे.

श्री. सुनील यांनी म्हटल्याप्रमाणे "चा" हे शब्दयोगी अव्यय नसून तो षष्ठी-विभक्ति प्रत्यय आहे.

मराठी आणि हिंदीचा हाच महत्वाचा फरक आहे.  ( हे हिंदीमध्ये लिहिताना असे लिहिले जाईल- मराठी और हिंदी का यही महत्व का फर्क है । )

चू.भू.द्या.घ्या.

कलोअ,
सुभाष