मी मराठी,
आपण सांगितलेले पटते. राज्यपाल हे एक अतिशय मुद्द्याबाहेरचे उदाहरण म्हणता येइल. माझा मुद्दा हा आहे की मुंबईत जिथे शिवसेना मराठी करीता लढत आहे(की आता जोर कमी आहे?)  जिथे त्यांनी लोकांच्या दुकानांच्या नामफलकांवर मराठीत नाव नसल्याने डांबर फासले होते, तिथे त्यांनाही हा मुद्दा लक्षात नाही? की त्यांनाही हा मुद्दा one-off वाटला. तिथे त्यांनी बाहेरच्यांना प्रवेश परीक्षेस येण्यास मनाई केली. पण आपल्या स्वतःच्या राज्यात पूर्णपणे काही अमलात आणता आले नाही. (इथे शिवसेना हे ही एक उदाहरणच आहे. जबाबदार तर सर्वच आहेत.)
आता इतर भाषीय लोक आले तर ते स्वतःच्या भाषेचा वापर करणारच. मी इथे बंगळूर मध्ये आहे. जर कोणी मराठी बोलणाऱा भेटला तर मी मराठीतच बोलणार (मग तो मद्रास चा ही माणूस का न होवो?) माझं काम होतंय ना?

आता मुख्य मुद्दा, हिंदी...
मी ऐकल्याप्रमाणे जेव्हा राष्ट्रभाषा निवडली जात होती तेव्हा हिंदी आणि एक दक्षिण भारतीय भाषा अशा दोन पर्यायी भाषा होत्या. पण मग हिंदी निवडल्यामुळे मग इतरांनी मग हिंदी न वापरणे सुरू केले. आता ही गोष्ट किती खरी किती खोटी ह्याचा मला अंदाज नाही. चू. भू. द्या. घ्या.
पण हे खरे असते आणि जर दाक्षिणात्य भाषा निवडली गेली असती तर ती ही भाषा शिकविली गेली असती आपल्या शाळेत.

-देवदत्त