एकंदरित भाग १ आणि २ आवडले. भाग ३ उत्तरार्ध आणि भाग ४ चा पहिला परिच्छेद यात ऋषींबद्दलची भाषा जरा अपमानकारक वाटली.(ऋषी मुनी हेही सामान्य मानव मानले तरीही सामान्य दुर्जनांसारखी त्यांची कथेत दर्शवलेली वागणूक वाचायला जरा कष्ट होतात.) पण अर्थातच भाषांतर आणि एकंदर कथाकल्पना उत्तम आहे. भाग ४ च्या शेवटी दिलेली फिल्मी कलाटणी आवडली आणि घडीची तलवार पण. धुंडीराजाच्या पोतडीतून आणखी गमतीदार वस्तू निघतील अशी आशा आहे.  

भाग ५ च्या प्रतिक्षेत.  
(प्रशासकमहोदयांना व्य. नि. पाठवून चारही आणि येणारा पाचवा भाग एकमेकाना शिवायला सांगता येईल. )