........ वाचून सोडून द्यावे वगैरे. परंतू या अशा पवित्र स्थानांची आपल्याकडे सध्या वाताहात लागल्याने कुणाचाच साधुसंतांवर आधीच विश्वास राहिलेला नाही त्यात असे वर्णन केल्यास काय प्रतिमा उभी राहील?

ह्या किंवा अशा विडंबनात्मक कथांमुळे साधुसंतांवरचा विश्वास उडेल असे मला वाटत नाही. साधुसंतांवरचा विश्वास उडेल तो त्यांच्या स्वतःच्या वर्तणुकीमुळे. हल्ली जे आश्रम आणि मठ दिसतात त्यापैकी किती ठिकाणी पवित्र वातावरण असते? जनतेच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन त्यांच्या फसवणुकीचे प्रकारही अशा आश्रमांत झाल्याचे कानावर येत असते. हल्लीच वृत्तपत्रात एका आश्रमाबद्दलचा जाहिरातवजा लेख वाचण्यात आला. त्या आश्रमात सर्व धर्माच्या, जातीच्या, प्रांतांच्या स्त्रीपुरुषांस प्रवेश होता असे मोठ्या अभिमानाने सांगितले होते. पुढे हेही सांगितले होते की फक्त HIV+ लोकांनाच त्या आश्रमात प्रवेश नव्हता. यावरून त्या आश्रमात काय चालत असेल याची कल्पना करता येईल. असो.