ही अमूल्य भेट मनोगतावर आणल्याबद्दल आपले व तशी परवानगी दिल्याबद्दल श्रीमती पुष्पा सुरेश भट यांचे शतशः आभार. या लेखांमूळे बरेचसे गैरसमज दूर होण्यास मदत झाली. (जसे विरोधाभास इत्यादी)

नव्या उदयोन्मुख गझलकारांना ही मालिका मार्गदर्शक तर ठरेल पण माझ्यासारख्या केवळ वाचकांनादेखील आता गझलेचा आस्वाद घेताना तिच्यातील गोडी खऱ्या अर्थाने चाखता येईल.