शिरीन, खूपच अप्रतिम लिहिलं आहे तुम्ही.

विविध रंगांची आणि आकारांची लहान-मोठी फ़ुलं डोळे फ़ाडफ़ाडून आमच्याकडे टकमका बघत होती. निळा, गुलाबी,जांभळा असे निराळेच रंग, निराळ्याच छटा! काही मिश्र रंगांचे तुरे, तर काही लालभडक रंगांची पानं! कुठे कुठे पाहू आणि किती किती पाहू! आमच्या मनाची तहान वाढतच चाललेली आणि दोन डोळे अपुरे पडणारे! 'व्यर्थ नव्हे का ओंजळ जेथे शरीर सारे म्हणते पाज!' रोमारोमात डोळे फुटावेत आणि ते फ़ाडफ़ाडून आपणही सर्व दिशांना सौंदर्याची बरसात करणाऱ्या त्या फ़ुलांकडे टकमका पाहावं.

कित्ती खास लिहिलं आहे तुम्ही. अगदी शहारून आलं मला. अग्गदी असंच वाटतं निसर्गाच्या सान्निध्यात. एकरूप होऊन जावंसं वाटतं त्या अगाध सृष्टीसौंदर्यात. तुमचा हा सर्व लेखच मी माझ्याकडे लिहून घेत आहे, तुमची हरकत नसेल तर. दुसरा भाग अजून वाचला नाही, आता वाचते आणि तिकडेही प्रतिसाद देईन. उपरोल्लिखित परिच्छेद अगदी घर करून राहिला आहे माझ्या मनात म्हणून लगेच मनात आलं ते तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून पुढचा भाग वाचायच्या आधीच हा प्रतिसाद लिहिण्याची घाई. असंच लिहित जा. धन्यवाद.