पुणे पलिका आयुक्तांचा निर्णय योग्यच आहे. सक्ति करावी लागली हे उचित नाही पण ती अनिवार्य दिसते. आता या निर्णयाची अंमलबजावणी मात्र झाली पाहिजे. नाहीतर तो निर्णय परत बासनात पडून राहिला तर काय उपयोग?
श्री. द्वारकानाथमहोद यांचा प्रतिसाद नीट कळला नाही. कोठचे लोक मराठीचे शत्रू आहेत? राज्यभाषा आणि लोकभाषा या दोन्हीबाजूने मराठीचा वापर वाढवण्याचे उपाय केले पाहिजेत.
त्यापैकी लोकभाषा म्हणून वाढविण्यासाठी कायदे/नियम करता येणे शक्य नाही. त्यासाठी मराठी जनतेला अस्मिता आणि मराठीचे प्रेम असायला पाहिजे. त्याला सर्व समाज एकत्र आणून लहानपणापासून सर्वांनी जाणीवपूर्वक आचरण केले पाहिजे.
राज्यभाषा म्हणजे सरकारी पातळीवर व्यवहार/कामकाज करणे हे मात्र कायदे/नियम योग्य रितीने मंजूर करूनच करता येईल. असे नियम कटाक्षाने अमलात आणले पाहिजेत. असे करण्यास भाग पाडणारे हे मराठीचे शत्रू आहेत असे द्वारकानाथमहोदयांचे म्हणणे आहे का?
मी महापालिका आयुक्तांचे आणि समर्थ मराठी संस्थेचे अभिनंदन करू इच्छिते.
(मराठी अभिमानी)
परभारतीय