एखाद्या कमलनेत्रा स्त्रिला पाहून "उपमा" या अलंकारात आपण "तिचे डोळे नुकत्याच उमललेल्या कमळासारखे आहेत" असे म्हणतो किंवा "उत्प्रेक्षा" मध्ये "तिचे डोळे म्हणजे जणू नुकतंच उमललेलं कमळ! " असे म्हणतो, तेव्हा आपल्याला ते डोळे बघून कमळाची आठवण होते हे अभिप्रेत असते. याच्या उलटे "भ्रांतिमान" मधे असते. जसे कालिदासाच्या एका नायकाला (नक्की आठवत नाही पण बहुधा 'मेघदूत' चा नायक) तलावातील नुकतीच उमललेली कमळे पाहून नायिकेच्या डोळ्यांचा भास होतो व तो म्हणतो... "ही उमललेली कमळे नाहीत तर माझ्या प्रेयसीचे सुंदर डोळेच आहेत"
अशावेळी तो भ्रांतिमान अलंकार असतो.
यात जर काही चूक झाली असेल तर जाणकारांनी कृपया दुरुस्त करावी.