सकाळ
१६ सप्टेंबर २००५
हिंदीविषयीच्या आकसाने विकासात अडथळे

"हिंदी भाषेविषयी सर्वसामान्यांमध्ये असलेले भय, आकस आणि दुजाभाव हे तिच्या विकासात मुख्य अडसर ठरत आहेत. हिंदी भाषेची स्वतंत्र अस्मिता जपून; लेखन आणि जीवनात तिचा वापर वाढवण्याची गरज आहे." असे मत "हिंदी दिवस" च्या निमित्ताने भरवण्यात आलेल्या प्रतिसादात व्यक्त करण्यात आले.

डॉ‌.शर्मा म्हणाल्या, "अभिव्यक्तीसाठी हिंदी ही सर्वात सक्षम भाषा आहे. हिंदीचे शब्दसामर्थ्य अफाट आहे. हिंदीला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. हिंदी राष्ट्रभाषा असली तरी देशातील सर्व राज्यांमध्ये अजून तिला मान्यता मिळाली नाही. या परिस्थितीत सकारात्मक बदल घडवण्यासाठी सामान्यांनीच पुढाकार घ्यावा."

डॉ.गुप्ता म्हणाल्या, "इंग्रजी भाषेचा सध्या गवगवा आहे. शिक्षण आणि नोकरीसारख्या ठिकाणी तिचा वापर अत्यावश्यक ठरत आहे. मात्र यामुळे हिंदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही."

श्री. भारद्वाज म्हणाले, "आर्थिक व्यवहारांमध्ये हिंदीचा वापर वाढवण्याची गरज आहे. याविषयी सर्व राजकीय पक्षांनी एकमुखाने आग्रही भूमिका मांडावी."
===

माझे प्रश्न-
१. हिंदीचा विकास हे ध्येय दिसते. तिच्या विकासाने व्यक्तीचा, समाजाचा, देशाचा विकास कसा होईल?
२. उणीपुरी २००-२५० वर्षे नवी भाषा इतकी निर्विवाद सक्षम कशी? कोणती ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा? मग हिंदी भाषिक लोकांमध्ये सामान्यतः दिसणारा उर्मटपणा कोणत्या संस्कृतिचे प्रतिक आहे?
३. हिंदीकडे दुर्लक्ष करून का चालणार नाही? उद्या सगळे जागतिक स्तरावरचे व्यवहार हिंदीतून होणार आहेत काय?
४. स्वातंत्र्योत्तर काळात सर्व राजकीय पक्षांनी या मुद्द्यावर एकमत होऊन काय साधणार आहे?