मराठीवरील इंग्रजीच्या प्रभावाबद्दल बरेचदा चर्चा होतात. परंतु मराठीवरील हिंदीच्या प्रभावाबद्दल फारसे चर्चिले जात नाही. अश्या प्रभावाची अजून काही उदाहरणे -

पाणी फिरणे - आणि त्याच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरले. "पानी फेरना" ह्या हिंदी वाक्प्रचाराचा इतका निर्बुद्ध अनुवाद शोधूनही सापडणार नाही ! आणि तोही "पाणी पडणे" असा सरळ सोपा मराठी पर्याय उपलब्ध असताना !

सम्पन्न होणे - मूळ मराठी अर्थ आहे भरभराट होणे. परन्तु आजकाल आमचे सर्वच कार्यक्रम "साजरे" न होता "सम्पन्न" होतात !