चित्तरंजन, राधिका, प्रभाकर पेठकर, तो, भोमेकाका, विनायक, वरदा, मृदुला, अनु, द्वारकानाथ, तात्या, शशांक, परेश, रोहिणी, प्रसाद, नीलहंस, मीरा फाटक, पद्मसंभव, श्रावणी, मंदार, जीएस... प्रतिसादाबद्दल हार्दिक आभार!

कथेतील भाग १ मधील काही शब्दांबद्दल (उदा. पब्लिक, रेकॉर्ड)वरदा आणि तो यांच्या प्रतिक्रियांच्या संदर्भात मला सांगवेसे वाटते की मूळ कथेत  शरद जोशी यांनी हेच शब्द वापरले आहेत, त्यामुळे मराठी अनुवादातही मी तेच शब्द ठेवले कारण मला हिंदी कथेतही हे शब्द फारसे खटकले नव्हते.

भाग २ मधे आश्रमकन्यांबद्दल वापरलेला 'माल' हा शब्दही शशांक, तो, राधिका व भोमेकाका यांना आक्षेपार्ह वाटला. पण हा शब्दही शरद जोशी यांचाच आहे. अनुवाद करताना दुसरा पर्यायी शब्द वापरता आला असता पण संपूर्ण कथेची धाटणी विडंबनात्मक असल्याने मला तशी आवश्यकता वाटली नाही.

राधिका व अनु यांचे आश्रम, ऋषी-मुनींबद्दलचे वर्णन याबद्दल काही आक्षेप आहेत. माझ्या मते या कथेचा हेतू निराळा आहे. ती निखळ विडंबनात्मक गुप्तहेर कथा आहे. 'वस्त्रहरण' सारखी नाटकं किंवा 'घडंलय-बिघडंलय' सारख्या दूरदर्शन मालिकांमध्येही पौराणिक पात्रांचा अपमान करण्याचा हेतू नसतो. शरद जोशी यांचाही तसा हेतू नसावा. 

'मेरी श्रेष्ठ व्यंग्य रचनाएं - शरद जोशी' या पुस्तकामध्ये आपण मूळ हिंदी कथेचा आस्वाद घेऊ शकता.

मी-माधुरी