भारतीयांसाठी राष्ट्र तर पाकिस्तान्यांसाठी धर्म
गॅलप इंटनॅशनल यांच्या व्हॉईस ऑफ पिपल याद्वारे केलेल्या २००५ सालच्या सर्वेक्षणानुसार बहुतांशी पाकिस्तानी स्वतःची ओळख धर्माने सांगतात तर भारतीय देशाने.
- कोणती ओळख महत्त्वाची
- भारत
- ३४% लोकांसाठी देशाच्या नागरिकत्वाने... 'भारतीय'
- १९% लोकांसाठी धर्मानुरूप
- पाकिस्तान
- ५९% लोकांसाठी धर्मानुरूप... 'मुसलमान'
- ८% लोकांसाठी देशाच्या नागरिकत्वाने... 'पाकिस्तानी'
- राजकारण्यांवर विश्वास-
- भारतात ९% लोकांचा
- जगभरात १३% लोकांचा
- पाकिस्तानात ३१% लोकांचा
- गेल्या वर्षभरात वैयक्तिक जीवनावर प्रभाव-
- भारतामध्ये
- कुटंबाचा ९२% लोकांवर
- मित्रांचा ४% लोकांवर
- धार्मिक नेत्यांचा १% लोकांवर
- पाकिस्तानामध्ये
- मित्रांचा १८% लोकांवर
- धार्मिक नेत्यांचा १२% लोकांवर
- ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास आहे असे घटक-
- भारतामध्ये
- ६१% लोकांचा लष्कर आणि पोलिसांवर
- ५८% लोकांचा पत्रकारांवर
- पाकिस्तानामध्ये
- ५५% लोकांचा धार्मिक नेत्यांवर
- ४२% लोकांचा पत्रकारांवर
- ३१% लोकांचा राजकारणी लोकांवर
- २९% लोकांचा लष्कर आणि पोलिसांवर
===
माझे मत-
प्रस्तुत दोन बातम्यांचे हे स्वैर भाषांतर आहे. अधिक माहितीसाठी मूळ बातम्या वाचाव्यात.
वैचारिकदृष्ट्या बरोबरीच्या लोकांत मैत्री होते असे म्हणतात. सर्व सर्वेक्षणांप्रमाणेच या सर्वेक्षणाला आणि त्याच्या निष्कर्षांना मर्यादा आहेत हे मान्य केले तरी यातून पुढे येणारे चित्र आशादायक नाही असे वाटते.