वाऽऽऽह ! नीलेश क्या बात है! तोंडाला पाणी सुटलं आहे अगदी !

आमच्याकडची पद्धत : मटकीसोबत वाटाणे न टाकता, नुसत्या मटकीचीच उसळ करतो. जिऱ्याऐवजी मोहरीची फोडणी घालतो. तेल गरम होण्याची चाचणी करण्याकरता मोहरी टाकून ती तडतडली की मग कांदा व आलं-लसूण पेस्ट टाकावी. टॉमेटो न टाकता, तिखटाऐवजी लवंगी मिरच्या टाकून करतो आम्ही ही मिसळ. मटकी मोड आणून घेऊन मग कूकरमध्ये एका गुळाच्या छोट्या तुकड्यासोबत ती शिजवून नंतर त्याची उसळ केली तर फोडणीनंतर एकदोन उकळीतच चविष्ट उसळ तयार होते. फरसाणापेक्षाही बारीक शेव टाकून खाल्लं तर जास्त छान लागतं. बारीक चिरलेला कांदा वरतून टाकून खाल्लं तर तोही खूपच खास लागतो.

इथे बऱ्याच ठिकाणी मिसळेबरोबर पाव देण्याची पद्धत आहे.. पण मग त्यातला कोल्हापुरी झटका ( कीक ) कमी होऊन जातो, जे मला अजिबात आवडत नाही. 

तुम्ही मीठ विसरला आहात  असे वाटते!