जेथे वरवर पाहता स्तुति वाटते पण सखोल विचार केला असता निंदा आहे असे कळते, किंवा वरवर पाह्ता निंदा वाटते पण आंतून स्तुति आहे असे वर्णन असते त्यास व्याजस्तुति अलंकार म्हणतात.

उदाहरणार्थ-
१) कृष्ण म्हणे गे कांते! बंधू विजयी म्हणोनि ओंवाळी
    करि भाउबीज यातें, चित्तीं कल्पूनि आज दिपवाळी

कृष्णाने रुक्मिणीच्या भावाचा पराभव केल्यावर तो तिला हे म्हणतो. वरवर पाहता ही स्तुति असली तरी यात निर्भर्त्सना आहे.

२) श्रीहरि नांवाचा हा 'चोर' भला या प्रसिध्द भूपृष्ठी
    स्मरण करी जो त्याचे, हरण करी सर्व पाप परमेष्ठी !!

आपला,
(सौंदर्यशोधक) धोंडो भिकाजी जोशी