आज विंडोज एक्स पी वर आय. एम. ई. चा प्रकार आजमावला. बराच उपयोगी प्रकार वाटला. फक्त हिंदी मराठीच नाही तर तामिळ वगैरे सुद्धा लिहीता येत आहे आय. एम. ई. वापरून.
एशियन अक्षरसंच वापरून मराठी टंकलेखन करता आले खरे पण अबकड वाला कळसंच वापरायच्या सवयीमुळे 'परेश' एवढेच लिहीण्यासाठीसुद्धा खूप प्रयत्न करावे लागले. शेजारी बसलेल्या कार्तिकेयनला तर तामिळमध्ये त्याचे नाव लिहीता लिहीता तामिळ अक्षरांची पुन्हा एकदा संपूर्ण ओळख झाली.
तरी ठीक आहे, सवय केल्यास नोटपॅडमध्येही हळूहळू मराठी वापरता येईल.