विलास,
   हरिपाठ ऐकायला/म्हणायला छानच वाटतो. आता त्याचे विवेचनही वाचावयास मिळणार याचा आनंद वाटतोय. आपला हा संकल्प सिध्दीस जावो अशी हार्दीक सदिच्छा.
  प्रस्तावना(?) अतिशय सुंदर शब्दात लिहिली आहात. जसे चिंतन तसे जीवन हे मनोमन पटणारे वाक्य. लवकरच या लहानश्या अभंगसंग्रहातील अभंगाचे विवेचन वाचावयास मिळावे अशी आशा.

मनोगतींपैकी कोणाकडे हरिपाठाची ध्वनिफित आहे का ? असेल तर माहितीजालावर चढवण्याची तसदी घेतलीत तर शतशः ऋणी होईल.

श्रावणी