दुवा देण्याची युक्ती श्रीमान भाष यांनी सांगितली आहेच. त्यात थोडी तांत्रिक माहितीची भर घालणे या चर्चाविषयाला अनुसरून होईल असे वाटते.

दुवा म्हणजे एखाद्या पानाची सेवादात्यावरील जागा (पाथ किंवा लोकेशन). जेंव्हा आपण दुव्यावर टिचकी मारतो तेंव्हा आपला ब्राऊजर त्या दुव्याशी संलग्न पानाची मागणी सेवादात्याकडे करतो आणि सेवादात्याकडून आलेले पान आपल्याला दाखवतो. 

<a href="http://www.xyz.com/node/123">गमभन</a>
असे जर HTML फेरफार मध्ये लिहिले तर साध्या पानावर आपल्याला फक्त "गमभन" दिसेल आणि "गमभन" वर टिचकी मारली असता त्याच्याशी संलग्न पान (म्हणजे http://www.xyz.com/node/123) आहे त्याच खिडकीत उघडेल.

दुव्याशी संलग्न पान नवीन खिडकीत उघडावे अशी इच्छा असेल तर दुवा देण्याच्या पद्धतीत थोडा बदल करावा लागेल. वर सांगितलेले उदाहरण
<a href="http://www.xyz.com/node/123" target="_blank">गमभन</a>
असे केले (इथे फक्त विशिष्ट जागी target="_blank" अशी भर घातली आहे) अशा दुव्यावर टिचकी मारली असता पान नवीन खिडकीत उघडेल.

आपला,
(दुवा-दाता) शशांक

कृपया प्रतिसादामध्ये १०% हून जास्त रोमन (इंग्रजी) अक्षरे वापरू नका.
कृपया प्रतिसादामध्ये १०% हून जास्त रोमन (इंग्रजी) अक्षरे वापरू नका.