वृकोदर महाशय

बहुधा आपण आपला प्रतिसाद उपरोधकपणे लिहीलेला दिसतो आहे. असं मानून मी तरी निदान तो वाचला.

पण जर आपण खरंच हा उपाय सुचवत असाल तर मात्र मोठा प्रश्न आहे.

१. अशा किती अधिकाऱ्यांना तुम्ही "कोणाकडून तरी" पैसे खिलवणार?
२. खिलवलेल्या पैशांचा मोबदला म्हणून काय मिळणार हे कसं ठरवणार?
३. ह्या बाबत काही लिखापढी होणार का? असं असेल तर ती कशी?
४. ज्यांना पैसे आपण "कोणाकडून तरी" खिलवणार आहात, त्यांनी कामं नाही केली तर?
५. किंवा ते अधिकारी बदलून त्यांच्या जागी दुसरे आले तर? हे दुष्टचक्र चालूच नाही का राहणार?
६. आज खराब रस्त्यांच्या "सुधारा"साठी अशी सूचना आली, उद्या इतर योजनांसाठी ही अशाच सूचना येतील, त्या मान्य करायच्या का?

अर्थात, परत एकदा सांगतो आपण आपली सूचना उपरोधाने आणि रागावून केली आहे असंच मानून मी तरी चालतो आहे, तरीही काही वाचकांना ती खरेच वाचून गोंधळ होण्याची शक्यता आहे, म्हणून हा खटाटोप.

आपला, मंदार...