सध्याच्या धकाधकीच्या जीवनात असे चिंतन वाचनात येणे गरजेचेच आहे. आपला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. पुढील निरुपण वाचण्यास उत्सुक आहे.
जसे चिंतन तसे जीवन हे जणू सुभाषितच . संस्कृतमध्येही एक असे सुभाषित आहेच.
यथा चित्तं तथा वाचः, यथा वाचः तथा क्रियाः ।
चित्ते वाचि क्रियायां च साधूनाम् एकरूपता॥
समश्लोकी अनुवाद- विचार जैसे तसे बोलणे, आणि वागणे साजेसे।
विचार वाचा वागण्यातही,सुजनजनांच्या साम्य दिसे॥
(शुभेच्छुक आशा)