याचाच उलटा प्रकार म्हणजे मूळ इंग्रजी वाक्प्रचारांची मराठी आवृत्ती. कधीकधी हा प्रकार बेमालूमपणे खपून जातो, असे भासते. जसे:
"ओ लॉर्ड, गिव्ह अस अवर डेली ब्रेड" ही खरेतर इंग्रजी भाषेतील एक ख्रिस्ती प्रार्थना. आता याचेच मराठी रूप पहा. "देवा, मला पाव." हिंदूधर्मीयांतसुद्धा खपून जाते.
- टग्या
***
हा विनोद आहे, हे मनोगतींनी कृपया ध्यानात घ्यावे. (फालतू आहे, पण विनोद आहे.) हो, उगाच "वाचकांची पत्रे" मध्ये फालतूची भर नको! आणि "व्यक्तिगत निरोपां"मार्फत "कारणे दाखवा नोटिसा" तर नकोतच नकोत!!!
***