माझ्या बंगलोरमधल्या वैयक्तिक अनुभवाप्रमाणे इथल्या लोकांना हिंदीबद्दल असा काही तिरस्कार नाही. एवढेच की हिंदी येत नसल्यामुळे ते हिंदी मधून बोलू शकत नाहीत. काही नाही तरी हे लोक कैसे हो भैय्या म्हणून आपल्याला हिंदी येते हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. माझा तामिळ घरमालकसुद्धा माझ्याशी हिंदीमध्येच बोलतो.
दक्षिणेमध्ये जितके हौशीने हिंदी चित्रपट बघितले जातात तितके कन्नड किंवा मल्याळी चित्रपटही बघितले जात नसतील.
पण हे बंगलोरमधले अनुभव. संपूर्ण दक्षिणेला लागू पडतीलच असे काही नाही.