(उदा. Banglore Task Force धर्तीवर.. पुण्यासाठी काही करता येईल का? याचा सध्या विचार IT Park मधील कंपन्या करत आहेत.)
हे हे हे.. बेंगलोर टास्क फोर्सविषयी बोलायचे तर त्यांनी बेंगलोरमध्ये एक गोष्ट आवर्जून केली आहे ती म्हणजे बेंगलोरसुद्धा रस्त्यांवरील खड्ड्यांच्या बाबतीत पुण्याच्या मागे पडणार नाही याची दखल घेतली आहे. त्यामुळे आता रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पुणे श्रेष्ठ की बेंगलोर हा वाद लौकरच उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रश्न "बेळगाव-कारवार" सह संयुक्त महाराष्ट्र चळवळीइतका गंभीर होण्याची शक्यता आहे, तस्मात, पुणेकरांनी याची आधीच खबरदारी घ्यावी.
शिवाय, या टास्क फोर्सच्या अस्थित्वानंतरही बेंगलोरची वाहन वाहतूक पाहताना ही भूमी नारायण कार्तिकेयाची जन्मभूमी असल्याची खात्रीच पटते. अशीच स्थिती आणखीन काही वर्षे राहिल्यास नारायण कार्तिकेयासारखे अनेक जागतिक दर्जाचे वाहन स्पर्धक निर्माण करेल अशी आशा पल्लवित झाली आहे.
चिंतातुर,
हृषिकेश