ह्या दागिन्यांचे साधारणपणे दोन गटात वर्गीकरण केलेले आढळते: शब्दालंकार, अर्थालंकार. थोडक्यात सांगायचे तर असे काही म्हणता येईल का - कानाला जे मधुर लागतात ते शब्दालंकार आणि मनाला जे मधुर लागतात ते अर्थालंकार.
अर्थालंकार उदा० उपमा, उत्प्रेक्षा, भ्रांतिमान, व्याजस्तुती इत्यादी
शब्दालंकार उदा० अनुप्रास, यमक (आणखी कोणते आहेत?) इत्यादी
अलंकारांचे आणखी काही वर्गीकरण होते का?
आपला
(वर्गवादी) प्रवासी