आपली मराठी  भाषा ही   संस्कृत भाषेपासून बनलेली आहे. 

मुळात संस्कृत ही एक इंडो-आर्यन भाषा आहे. आणि इंडो-आर्यन ही इंडो-इराणियान भाषेची शाखा आहे.आणि या सगळ्या भाषा या इंडो-युरोपियन भाषेच्याच उपशाखा आहेत.

इंडो-युरोपियन--->इंडो-इराणियन--->इंडो-आर्यन--->संस्कृत --->मराठी

इंडो-युरोपियन भाषेत जवळ जवळ ४४३ प्रकाराच्या भाषा आणि त्यांच्या उपभाषा आहेत.

युरोपच्या पूर्वेला येणाऱ्या भागांत इंडो-इराणियन भाषा बोलल्या जातात.  ज्यात आपल्या मराठी,संस्कृत, हिंदी,गुजराथी ,काश्मिरी प्रमाणेच फारसी(पर्शियन),गवारबाटी(अफगाणी),पुष्टोनी(पठाणी),कुर्डिश(तुर्की) वगैरे भाषा येतात.

म्हणजेच, भारतावर मुसलमानी आक्रमणांपूर्वी पासूनच बोलल्याजाणाऱ्या भाषांमध्ये फारसी,तुर्की  उच्चार ,शब्द येत असणार.

जी राजभाषा ती बोलीभाषा होत असल्यामुळे, मुसलमानी आक्रमणानंतर, आणखीन शब्दा आपल्या मराठी भाषेत आले असण्याची शक्यता नक्कीच आहे.

तज्ज्ञ त्याबद्दल अधिक मार्गदर्शन करतीलच.

 

gauri