यमक अलंकाराचे आणखी पोटभेद आहेत. पुष्पयमक, दामयमक वगैरे. कुणाला माहीत आहेत का हे प्रकार?
त्यात कुठल्यातरी प्रकारात ओळीच्या सुरवातीला आणि शेवटी तोच शब्द येतो. उदा. सदाश्रित पदा ...... नमस्ते सदा वगैरे. हा कुठला पोटभेद?
कुठल्यातरी प्रकारात यमक ओळीच्या शेवटी जमवण्याऐवजी ओळीच्या सुरवातीला जमवलेले असते! हे संस्कृत उदा. पाहा.
इतर तापशतानि निजेच्छया ।
वितर तानि सहे चतुरानन ।
अरसिकेषु कवित्व निवेदनं ।
शिरसि मा लिख मा लिख मा लिख ॥
असे मराठीतले एखादे उदाहरण माहीत आहे का कुणाला?