प्रिय गौरी, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. संस्कृत ही काही अपवाद वगळता सर्व भारतीय भाषांची जननी आहे. भारतीय उपखंडातल्या भाषांवर तिचा निःसंशय प्रभाव आहे. आर्य लोक संस्कृत बोलत असत असे आपण मानतो. आर्यांनी या देशाला भारतवर्ष असे नाव दिले होते. आणि त्यांची वस्ती काबूल कंदाहार(तेव्हाचे गांधार-शकुनीचे राज्य) पासून इंडोनेशियापर्यंत पसरले होते असे उल्लेख आढळतात. त्यामुळे या प्रचंड भूभागावर संस्कृत भाषेचा प्रभाव असणे सहज शक्य आहे. पर्शिया अर्थात इराण हा पर्शियन लोकांचा मूळ देश आहे. या लोकांना आज आपण पारशी असे संबोधतो. हे पारशी लोक मूळचे आर्यच असावेत कारण त्यांचा धर्मग्रंथ अवेस्ता आणि वेद यांमधे अतिशय धक्कदायक साम्य आढळते. त्यांचे देव आणि सणसमारंभ हे देखिल वैदिक संदर्भ असलेले आहेत.इराण हे नावच मुळात 'आर्याणाम्' याचे अपभ्रष्ट रूप आहे. त्यामुळे तुर्कस्तान-अरबस्तान येथे बोलल्या जाणाऱ्या (आणि नंतर परकीय आक्रमकांमुळे भारतीय भाषांमधे मिसळून गेलेल्या) भाषा आणि संस्कृत भाषा यांच्यात साम्य आहे. त्यात नवल काहीच नाही. संस्कृत भाषेचे व्याकरण लिहिणारा पाणिनी अरबस्तानात राहात होता त्यामुळे या सर्व प्रदेशांमधे समान सांस्कृतिक धागे आहेत.(नंतरच्या काळात इतिहासाचा विसर पडला आणि तेथील लोक आपल्यासाठी परकीय झाले. कदाचित दोन-तीनशे वर्षांनंतर आपण आणि पाकिस्तान यांच्या लोकांच्यात असेच काहीतरी घडेल कदाचित....) त्यामुळे या सर्व भाषा एकाच (किंवा एकाच प्रकारच्या )भाषेपासून निर्माण झाल्या असाव्यात असे वाटते. त्यामुळेच या सर्व शब्दांमधे इतके साम्य आढळते.
या विषयावर अधिक विस्तृत माहिती देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
अदिती
ता.क. आज या विषयावर छान चर्चा वाचली त्यामुळे सर्व चर्चा वाचून सुचलेले विचार एकत्र मांडायचा प्रयत्न केला आहे. चूभूद्याघ्या