भजनरहित रामा सर्व हा जन्म गेला
स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला

- करुणाष्टके / संत रामदास

म्हातारी उडता नयेचि तिजला 
   माता मदीया अशी
कांता काय वदो नवप्रसव ते
   साता दिसांची तशी
पाता त्या उभयांस मी मजविधी
   घातास योजीतसे
हातामाजि नृपा तुझ्या गवसलो
   आता करावे कसे?

- नलदमयंतीस्वयंवराख्यान / रघुनाथपंडित

ही काही सर्वोत्तम उदाहरणे नाहीत, परंतु थोडीशी तशी वाटतात. चू भू द्या घ्या.

आपला
(प्रवाही) प्रवासी