हाहा आगाऊराव, अहो पाणिनी भारतीयच होता.... तेव्हाचा भारतदेश आत्तापेक्षा कितीतरी जास्त प्रदेशामधे पसरला होता. पंजाब हे तेव्हा heart of civilization  होतं हो.... उगाच पाणिनीच्या भारतीयत्वाबद्दल शंका घेतलीत तर बिचाऱ्या संस्कृतभाषेला भवितव्य उरणारच नाही आजच्या युगात.... मला नेहेमी गंमत वाटते की हजारो मैलांवरून इथे संस्कृत शिकण्यासाठी म्हणून विद्यार्थी येतात. हाल-अपेष्टा काढतात आणि हे अमोल ज्ञान तिकडे घेऊन जातात. इंग्रजांनी या देशाचं जे नुकसान केलं त्यात प्रमुख नाव येतं ते इतिहाच्या मोडतोडीचं आणि त्यानंतर इथले ग्रंथ देशाबाहेर नेण्याचं. आज जर्मनीच्या ग्रंथालयांमधून सुमारे १०० संस्कृत पोथ्या अशा आहेत की ज्यांच्या प्रती आपल्याकडे नाहीत आणि त्यांचे संशोधन करुन त्य मुद्रितही झालेल्या नाहीत. आपल्याला आपल्याच पोथ्यांना हातही लावता येत नाही आणि हळद-कडुनिंबासारखे हे विषय कोणाला माहितही नसल्यामुळे काहीच करता येत नाही. आपल्याला आपला इतिहास आणि आपल्या भाषा यांच्याबद्दल योग्य अभिमान ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी या गर्तेतून आपण बाहेर येऊ. भारताचा शोध घेण्याच्या नादात पाश्चात्य लोकांनी जगाचा शोध घेतला आणि स्वतःची केवढी तरी प्रगती करून घेतली आणि ज्ञानाचा तोच समुद्र आपल्या पायतळी तुडवत आपण अजूनही अज्ञानात खितपत पडलो आहोत... आपण स्वतःचा शोध कधी घेणार?

अदिती