मी मराठी,
काल माझा मराठी मित्र आणि त्याच्याबरोबर एक तेलुगू भाषिक आले होते. त्या तिसऱ्या व्यक्तीला हिंदी येत होते तरीसुद्धा आमचे संभाषण (प्रयत्नपूर्वक) इंग्लिशमधून केले.
दोन प्रश्न मनात उद्भवले-
१. परदेशस्थ भारतीयांनी अश्या परिस्थितीत हिंदी ऐवजी इंग्लिशमधून व्यवहार केल्याने काय आणि कसा फायदा होईल?
२. हिंदी गाणी आणि चित्रपट, त्यांचे काय करावे?
मराठी गाणी आणि चित्रपट तितकेच आवडतात. पण गाडीत आम्ही तिघे होतो तेंव्हा हिंदी व्यतिरिक्त इतर स्थानिक भाषेत गाणी लावणे (मोजकी इंग्लिश गाणी सोडून आम्हाला तिघांनाही आवडत अथवा समजत नाहीत!) असभ्यपणाचे आणि मराठीमधून गाणी लावणे अरेरावीचे ठरले असते असे वाटते. हिंदीच्या (न) वापराबद्दलचे आपले मुद्दे पटले असले तरी हिंदी चित्रपट आणि गाणी (विशेषतः जुने/जुनी) मनातून काढून टाकणे अतिशय अवघड आहे असे दिसते.