पूजेमधले पंचामृत वेगळे आणि विशेष जेवणवळीमध्ये वाढतात ते पंचामृत वेगळे.  मिरच्यांचा तिखटपणा झाकून टाकणारे काजू, दाण्याचे कूट, चिंच-गुळाचे पंचामृत हे (पत्रावळीच्या) पानात वाढलेले अजून डोळ्यापुढे येते.

पूर्वीच्या पुण्यातल्या लग्नाच्या जेवणातले पंचामृत हा माझा फार आवडता पदार्थ होता.  आळूची भाजी, वाटली डाळ, पुरण, पंचामृत हे नेहमी जेवणात नसलेले पदार्थ, नुसत्या आठवणीने तों.पा‌‌.सु.

सध्या बाहेरगावी असल्याने "रुचिरा" किंवा "स्वयंपाक" मधून "त्या" पंचामृताची अधिकृत पाककृति इथे देता येत नाही.

कलोअ,
सुभाष